top of page
  • Writer's pictureDr Nikhil Wasnik

कोविड १९ - एका डॉक्टरची सामाजिक जबाबदारी (also translated in English)

माझे नाव निखिल सारनाथ वासनिक असून मी वडसा, तालुका देसाईगंज, जिल्हा गडचिरोली येथील रहिवासी आहे. मी MBBS च्या शेवटच्या वर्षाला असताना पूर्ण जगावर तसेच भारतावर कोरोना चा प्रकोप झाला व आपल्या देशात लॉकडाऊन लागले.

आता समस्या ही होती की कोरोना हा आजार लोकांनी पहिल्यांदा ऐकला होता आणि त्यावर उपाय सुद्धा माहिती नव्हता, तर आता करायचे काय हा मोठा प्रश्न समोर उभा होता . दररोज पेशंटची संख्या अगदी वेगाने वाढत होती आणि ह्या सर्व गोंधळात आपण MBBS फायनल year ला असून सुद्धा काही करू शकत नाही या गोष्टीने अस्वस्थता वाढत होती.

मनात सेवाभावी विचार व मदत करण्याची तगमग होती पण ती कशी करावी या गोष्टीचा उलगडा होत नव्हता. एकीकडे लॉकडाऊन आणि दुसरीकडॆ मनामनांत पसरलेली Covid ची भीती, त्यामुळे मी स्वतःची जवाबदारी ओळखण्याचा प्रयत्न करू लागलो. मी जास्त काही करू शकलो नाही तरी माझ्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा थोडा ना थोडा तरी जनतेसाठी व्हावा म्हणून मी तालुक्यात असलेल्या Covid Care Centre मध्ये जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला. माझ्या परिवारातले लोक खूप जास्त काळजीत होते आणि त्यांना माझा निर्णय मंजूर नव्हता , पण खूप प्रयत्नानंतर त्यांना समजावण्यात मला यश आले आणि सुरुवातीला मी तिथल्या Covid OPD ला Join झालो.

मी आधीच Sickle Cell Carrier असल्यामुळे जास्त काळ PPE किटमध्ये राहता येत नव्हतं कारण श्वास घ्यायला खूप त्रास व्हायचा पण तरी सुद्धा जितका कामात हातभार लागेल तितका लावू या विचाराने मी काम करत होतो. मग ते रुग्णांचे नमुने घेणे असो किंवा सेंटर मध्ये असलेल्या रुग्णांना पिण्याचे पाणी देणे.

ही पहिलीच वेळ होती जेव्हा मी On Field प्रत्यक्ष काम केले आणि ते सुद्धा इतक्या कठीण परिस्थितीत!! त्यामुळे तो अनुभव अविस्मरणीय होता.

खरे सांगायचे तर, सुरुवातीला असा कित्येक वेळा विचार आला कि मोबदला नसतांना सुद्धा आपण हे का करत आहोत ? पण “खऱ्या योद्ध्याची ओळख बिकट परिस्थिती मधेच होत असते’’ हे मनात आले कि हे सगळे विचार आपोआप उडून जायचे. त्यामध्ये माझे सिनियर्स डॉक्टर इकबाल सर, डॉक्टर मेश्राम सर हे सतत मला Motivate करत राहात त्यामुळे मग मी परत जोमाने कामाला लागायचो.

Covid Care Centre मध्ये काम करत असतांना मला एक अनुभव आला जो मला सांगावासा वाटतो, तो म्हणजे एका ८०-८५ वर्षाच्या वयस्कर Covid रुग्णाचा .

तिथे काम करत असतांना मला ते भेटले आणि त्यांच्या चेहऱ्यावरची भीती मला जाणवली . त्यामुळे ते दिसले की मी त्यांच्या बरोबर गप्पागोष्टी करायचो आणि ते सुद्धा आपले मन माझ्याजवळ मोकळे करायचे. रोज असा आमचा हा नेम ठरलेला असायचा आणि त्यातून त्यांना शारीरिक आधारापेक्षा मानसिक आधाराची कशी गरज आहे हे मला कळले. त्यातून ते सुदैवाने बरे झाले आणि माझा निरोप घेतांना बोलले , "कधी पण आमच्या गावाला आलात तर जेवण केल्याशिवाय जायचे नाही कारण माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाही तर मी फक्त निमंत्रण देऊ शकतो." हे शब्द कुठल्याही मोबदल्या पेक्षा अमूल्य होते. वैद्यकीय क्षेत्रातील हीच माझी पहिली कमाई म्हणता येईल.

दुसरी गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे आमच्या गावाची. Covid काळात आमच्या गावात lockdown चे नियम लोक अक्षरशः लाथाडत होते. त्यामुळे जरी आतापर्यंत गावामध्ये पेशंट सापडले नसले तरी गावात Covid पसरू शकतो या गोष्टीची शक्यता नाकारता येत नव्हती. मी असाच एक दिवस माझ्या सवंगड्यांसोबत बसलो होतो. सवंगडी म्हणजे असे कोणी मोठ्या व्यक्ती किंवा माझ्या वयाचे मित्र नाही तर वेगवेगळ्या वयाचे लोक . त्यात १०-२५ या वयाचा समावेश असणारे मुले व मुली ही होती . तर आम्ही मित्र-मैत्रिणी बसलो आणि आपल्या या गावात Covid चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील हे आपल्याच पातळीवर बोलू लागलो. आम्ही एक कच्चा आराखडा तयार सुद्धा केला.


आराखड्यामध्ये आमचा मुख्य मुद्दा हा होता की आम्ही आधी तर सगळ्या गावकऱ्यांची बाजू ऐकून घ्यायची आणि मग त्यांना आपला मुद्दा पटवून सांगायचा. मग एका रात्री आम्ही सगळ्यांनी मिळून एक बैठक घ्यायची असे ठरवले, बैठक झाली व त्यामध्ये काही लोक आमच्या बाजूने तर काही आमच्या विरोधात उभे झाले. थोडे वाद सुद्धा झाले. शेवटी आमचे असे ठरले कि गावाच्या मुख्य रस्त्यावर आम्ही बसणार आणि तिथे नाक्या सारखं Gate उभारून गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करून त्याची सगळी माहिती आपल्या परीने लिहणार . येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला Sanitize केल्याशिवाय आणि Mask असल्याशिवाय गावात प्रवेश देण्यात येणार नाही. असं सगळं ठरल्यावर गावकरी तिथे बसू लागले .

आमच्या या उपक्रमात भरपूर अडचणी आल्या, भांडणं झाली, शाब्दिक वाद झाले पण आमचे कार्य मात्र सुरु राहिले. अशा रीतीने पहिल्यांदाच एखादे सामाजिक काम करताना, ते पण एका वैद्यकीय विद्यार्थ्याच्या भूमिकेत असून सुद्धा, किती अडचणी येऊ शकतात, हे खूप जवळून अनुभवले.

येणारे संकट कसे मानसिक व शारीरिक ताण देऊन जाते हे त्या काळात जाणवले. मात्र जर एक कर्तव्यदक्ष व समजदार नागरिक म्हणून आपण सामाजिक बांधिलकी जपली तर कुठलेही संकट जास्त काळ टिकू शकत नाही याचा सुद्धा बोध झाला.
लेखकाबद्दल-

डॉ. निखिल वासनिक हे अकोला येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाचे इंटर्न आहेत. त्यांना पोहणे, सायकल चालवणे आणि कविता लिहिणे इत्यादी छंद आहेत.English Translation:


COVID-19- The Social Responsibility of a Doctor


I am Nikhil Sarnath Wasnik, a resident of Wadsa, Taluka Desaiganj, District Gadchiroli. While I was in my final year of MBBS, the whole world along with India suffered the wrath of COVID-19 and the whole country went under lockdown.


The issue here was that COVID-19 was a disease that people were just beginning to learn about and were utterly confused about what to do next. Every day the patient count was rising rapidly and in this chaotic situation, I was feeling restless as I could do nothing in spite of being a final year MBBS student.


The heartfelt desire of doing social service and helping patients was on my mind but I didn't know how. On one hand, there was the lockdown and on the other hand, the fear embedded in the minds of the people due to COVID-19. Both of these things prompted me to consider my role and identity in this scenario. Even if I couldn't do much in my capacity as a medical student, I decided to do at least something by joining the COVID Care Centre in my Taluka. My family was worried about me and didn't agree with my decision at first, but after much convincing, they finally agreed.

As a sickle cell carrier, I was unable to wear the PPE kit for an extended period of time due to breathing difficulties, but the prospect of doing whatever was feasible kept me going, be it collecting patient samples or even providing them with water to drink.


This was the first time that I was working in the field and the circumstances were difficult. The experience will hence, always be unforgettable.


To be honest, there was always that nagging notion in the back of my mind: "Why am I doing all of this for free?" But the idea "A true warrior's identity is always tested in challenging times", would dispel any doubts. My seniors, Dr. Iqbal and Dr. Meshram always motivated me and that kept me going.


I'd want to share an encounter I had with an octogenarian COVID-19 patient I met at the COVID Care Centre.


Whenever I met him, I could feel the fear on his face. So anytime I saw him, I would strike up a conversation with him, and he would converse with me openly as well. This became our daily routine and through that, I realized, what he needed most was mental support rather than physical support. Fortunately, he recovered and while bidding me farewell he said “Whenever you come to my village do have lunch with me because there is nothing I can offer you other than an invitation". These words were more valuable than any sort of remuneration. And this was my first reward in the medical field.

The second story I feel like sharing is of my village. During the time of COVID-19, the people in my village were not at all serious about the lockdown rules. So even if there were no patients in our village at the time, the possibility of COVID spreading in our village could not be denied. Therefore one day, I sat down with my friends for a talk. My friends here were not individuals my age or older, but people of various ages. The group included girls and boys between the ages of 10 and 25. So our group sat together and began discussing the steps to avoid COVID on our level in the village, and we worked out a basic framework for it.

In the outline, our main point of discussion was to listen to the perspective of the villagers and then convince them about our outlook. On the night of that meeting, some people supported our cause whereas some were against it. A lot of arguments did happen but ultimately we planned to create a main gate at the entrance of the village and to screen every outsider who entered the village, noting down their details. Every outsider would have to be sanitized and would be asked to wear a mask mandatorily. The plan was then put into effect.


Our campaign encountered several challenges; nonetheless, despite the conflicts and arguments, our work persisted. As a result, despite being a medical student, I faced the hardships that might arise while doing something for society.


What I realized in that difficult phase is that problems have the potential to cause immense mental and physical stress. But, if we can be responsible and dutiful citizens who realize their social responsibility, no problem is too big.


About the Author:

Dr. Nikhil Wasnik is a final year intern at Government Medical College, Akola. His hobbies include swimming, cycling, and writing poems.

(Translation Credits: Ragini Mohite)

683 views

Recent Posts

See All

Comments


bottom of page